खर्डे (वार्ताहर )यात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होऊन पिक लागवडीसाठी करण्यात आलेला खर्चही पदरात मिळणार नाही.अशी स्थिती असल्याचे चित्र सत्यामापन या शासकिय समितीच्या निदर्शनास आले आहे.देवळा तालुक्यातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यामध्ये निवड झालेली असल्याने त्या अनुषंगाने तालुक्यातील पाच गावांची निवड जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी यांनी गावांची निवड करून वडाळा व शेरी या गावाची पाहणी दौर्यादरम्यान सत्यता तपासण्यात आली.यावेळी तालुक्यातील मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी , चार तलाठी, व संबंधित गावांचे ग्रामसेवक आदींची समिती तयार करून त्यांची निवडलेल्या गावांची निवड करून प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील प्रमुख पिक ठरविण्याच्या व्याख्येनुसार गावाच्या एकूण पिकपेरणी झालेल्या पिकांचे क्षेत्र आहे. असे पिके, प्रमुख पिक म्हणून संबोधून पिकांची समितीने प्रत्यक्ष शेतात जावून प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली व पिकाची सत्यामापन, संबधित माहिती, पिकाची स्थिती पिकाचे फोटो इ.संदर्भात मोबाईल अॅपवर माहिती अपलोड करण्यात आली. संबधित शेतकऱ्यांना या पाहणीच्या आधारे शासकीय मदत मिळणार आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक सुर्यवंशी, गटविकास अधिकारी महेश पाटील, तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, पंचायत समतिी कृषी अधि.प्रशांत पवार, मंडळ अधि.वाल्मिक हिरे, ग्रामविकास अधिकारी जे.व्ही.देवरे, रु पेश आहेर, कृषी सहायक श्रीम.जाधव, पी.बी.परदेसी, तलाठी सुवर्णा थेटे, सोनाली देवरे, भागिरथी सावळे, पुरु षोत्तम हेंबाडे, पाटील शेतकरी रतन पवार आदी उपस्थित होते.
दुष्काळ सदृश परिस्थिती पहाणीसाठी सत्यामापन समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 2:49 PM
खर्डे (वार्ताहर )यात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होऊन पिक लागवडीसाठी करण्यात आलेला खर्चही पदरात मिळणार नाही.अशी स्थिती असल्याचे चित्र सत्यामापन या शासकिय समितीच्या निदर्शनास आले आहे.
ठळक मुद्देनाशिक जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती सत्यता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याआदेशानुसार दुष्काळ सदृश परिस्थिती पहाणीसाठी सत्यामापन समितीने मंगळवारी वडाळा व शेरी या निवड झालेल्या गावांचा दौरा केला .