नाशिक- नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोंधळ उडाला. आज सभेचे कामकाज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्यानंतर भाजप नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, श्याम बडोदे, संभाजी मोरुस्कर यांनी सावरकर यांच्या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करा, अशी मागणी केली.त्याला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला तर सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सभा अर्धातास तहकूब करण्याची मागणी केली त्यानंतर भाजप नगरसेवकांनी देशभक्ती तुझे नाव सावरकर, सावरकर आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला त्यात अर्धा तास कामकाज तहकूब केले. यावेळी शिवसेना नगरसेवक मात्र शांत बसले होते. दरम्यान, महासभेत भाजपने नागरिकत्व कायद्यातील सुधारणाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले त्यास राष्ट्रवादीने विरोध केला.
नाशिक महापालिकेच्या महासभेत सावरकर यांच्या विषयावरून तुफान घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:43 PM