सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत रांगोळीच्या माध्यमातून ‘लेक वाचवा, देश वाचवा’चा संदेश देण्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य रांगोळी साकारली.उपक्रमशील विद्यालय म्हणून ओळख असलेले हे विद्यालय नेहमी विविध उपक्रम राबविते. २०१५ला निरोप देतानाच विद्यालयाच्या प्रांगणात नववर्षाचे स्वागतासाठी विद्यार्थिनींनी भव्य रांगोळी रेखाटली. देश वाचविण्यासाठी मुलगी वाचविणे गरजेचे असल्याचा संदेश या रांगोळीतून देण्यात आला. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी ‘लेक वाचवा, देश वाचवा’ या विषयावर मार्गदर्शन केले. कर्जबाजारीपणामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी सतत जनजागृती करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. जनजागृतीची घेतली शपथ‘मी देशाचा नागरिक या नात्याने मुलगी वाचवणे हे माझे कर्तव्य आहे. जन्माच्या अगोदर मुलीची हत्त्या करणार नाही आणि करू देणार नाही. मुलगी वाचविण्यासाठी जनजागृती करेल. भ्रूणहत्त्या होऊ देणार नाही’, अशी प्रतिज्ञा यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी केला. (वार्ताहर)विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात भव्य रांगोळी रेखाटून मुलगी वाचविण्याचा संदेश तर दिलाच, त्याबरोबरच मुलगी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची शपथ घेतली. यावेळी बी.आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. आर. शिंगोटे, एम. एम. शेख, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
‘लेक वाचवा, देश वाचवा’
By admin | Published: December 31, 2015 10:36 PM