ओझर - येथून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या बाणगंगानगर शाळेत दप्तरमुक्त अभियान अंतर्गत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्र म घेण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.‘बेटा बेटी एक समान, दोघांनाही शिकवा छान’ या संदेशाप्रमाणे स्त्री शिक्षणाचा जागर म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्र ांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सुरू केलेल्या या उपक्र माच्या अंतर्गत सुमारे सव्वा लाखाहून अधिक मुलींच्या नावाच्या पाट्या येत्या २६जानेवारीपर्यंत लावण्यात येणार आहेत. ‘आमची मुलगी ,आमचा अभिमान’ असे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेला हाउपक्र म निफाड तालुक्यातील बानगंगानगर शाळेमध्ये करण्यात आला. स्त्रीभ्रूणहत्या ,अन्याय, अत्याचार हुंडाबळी, मुला-मुलींमधील भेदभाव, स्त्रीचे रक्षण,मुलींच्या हक्काच्या शिक्षणातून होणारी गळती, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान अशा मानवनिर्मित विविध संकटातून आपली लेक सर्व बाजूंनी वेढली गेली आहे आणि हेच थांबवण्यासाठी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ लेक वाचली तरच प्रगती होईल आणि या गोष्टीतून मुक्तता होईल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस व शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर (झनकर) यांच्या पुढाकाराने हा उपक्र म सुरू करण्यात आलेला आहे. प्रत्येक घराच्या दारावर विद्यार्थिनीचे संपूर्ण नाव पत्ता व शाळेचे नाव लिहिलेली रंगीत पाटी लावण्यात आली. शाळेतील उपक्र मशील शिक्षिका नलिनी आहिरे यांनी तयार केलेल्या लेक वाचवा लेक शिकवा या घोषवाक्याच्या पणत्या, फलकचित्रे घोषणा देत प्रभात फेरी काढली . कार्यक्र मात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पवार,ओझर गावचे पोलीस पाटील सुनील कदम, शिक्षण प्रेमी बाजीराव वाघ, बाजीराव सताळे, विक्र म पवार, लताबाई कदम, रोहिणी जाधव, वंदना पवार उपस्थित होत्या.
बाणगंगानगर शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 2:46 PM