वडझिरे येथिल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्यात आले. शासनाच्या विविध योजनेचे अनुदान तसेच शालेय पोषण आहाराचे पैसे हे सदर खात्यामध्ये जमा होणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत जाता येत नसल्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले होते. येथील पोस्ट मास्तर चंद्रकांत विनायक कडवे यांनी विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधून त्यांचे ॲप्लीकेशन फॉर्म भरून तब्बल ४५ विद्यार्थ्यांचे बचत खाते नाशिकरोड कॅम्प सब कार्यालयाच्या मदतीने एकाच दिवसात उघडण्यात आले. विद्यार्थी व पालकांना मुख्याध्यापक रहाटळ व चंद्रकांत कडवे यांच्या हस्ते पासबुकचे वितरित करण्यात आले.
फोटो---
सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथिल शालेय विद्यार्थ्यांना पासबुकचे वितरण करतांना मुख्याध्यापक रहाटळ व पोस्टमास्तर चंद्रकांत कडवे आदी. (१७ नायगाव)
170721\144517nsk_6_17072021_13.jpg
१७ नायगाव