सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नांदूरवैद्य येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीत आवर्तन पद्धतीने उपसरपंच पद रिक्त होते. निर्धारित वेळेत सविता काजळे यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतींच्या सरपंच उषा रोकडे, ग्राम अधिकारी किरण शेलावणे, ॲड. चंद्रसेन रोकडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रीमती काजळे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सरपंच उषा रोकडे, माजी सरपंच दिलीप मुसळे, माजी उपसरपंच पोपटराव दिवटे, माजी उपसरपंच नितीन काजळे, ग्रामविकास अधिकारी किरण शेलावणे, ॲड. चंद्रसेन रोकडे, ग्रामपंचायत सदस्य ललिता काजळे, सविता काजळे, वैशाली मुसळे, कुंडलिक मुसळे, लक्ष्मण पुंजा मुसळे, सुकदेव दिवटे, मनोहर काजळे, प्रभाकर मुसळे, संतोष भागवत, मारुती डोळस, माधव कर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- २८ नांदूरवैद्य काजळे
नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेल्या नवनिर्वाचित उपसरपंच नितीन काजळे यांचा सत्कार करताना सरपंच उषा रोकडे. समवेत ग्राम अधिकारी किरण शेलावणे, माजी सरपंच दिलीप मुसळे, ॲड चंद्रसेन रोकडे व इतर सदस्य व ग्रामस्थ.