शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सावित्रीबाई फुले जन्मदिनी ‘लेक शिकवा’चा जागर

By admin | Published: January 03, 2017 11:32 PM

अभिवादन : जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या वतीने शहर परिसरात कार्यक्रम

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालय तसेच विविध संस्था व संघटना आदिंच्या वतीने शहर परिसरात उपक्रम राबविण्यात येऊन सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले. पेठे विद्यालयात ‘बालिका दिन’ नाएसो संचलित पेठे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात ‘बालिका दिन’ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जाधव यांनी सावित्रीबार्इंचे शैक्षणिक कार्य सांगितले. उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे यांनी ‘आजची यशस्वी स्त्री’ची यशोगाथा सांगितली. कुंदा जोशी यांनी सावित्रीबार्इंचा इतिहास व स्त्रीपुढील समस्या सांगितल्या. याप्रसंगी यश जाधव, साहिल उघडे, अनुष्का उघडे, वैष्णवी सूर्यवंशी, यश गुजराथी या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तर गोविंद देशमुख यांनी गीत सादर केले. व्यासपीठावर मुक्ता सप्रे, मंगला देव्हाड, विजय पाटोळे, शर्मिला खानीवाले, शैलेश पाटोळे आदि उपस्थित होते. निर्मिक फाउंडेशनतर्फे अभिवादननिर्मिक फाउंडेशन यांच्या वतीने अशोकस्तंभ येथे सावित्रीबाई फुले यांची १८६वी जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेववक शालिनी पवार, रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार, बाजीराव तिडके, संजय काळे, आकाश खोडे, संदीप शिंदे, प्रकाश पर्वतीकर, फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल, उपाध्यक्ष संदीप बच्छाव, सचिव नितीन पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गणेश आमले, अंबादास शेळके, दादाजी बागुल, सचिन बागुल, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, बाबासाहेब खरोटे, हेमंत गोवर्धने, दुर्गा बागुल, रोहिणी गांगुर्डे, आदिंसह नागरिक उपस्थित होते.