सावकी ते विठेवाडी हा साधारण दोन किलोमीटर अंतराचा रस्ता असून या रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने जागोजागी खड्डे दिसून येत आहेत. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या डांबरी रस्त्यापेक्षा खोल गेल्याने सदर रस्त्यावरून प्रवास करणे अडचणीचे झाले आहे. या रस्तयावर दोन वाहने समोरासमोर आली की वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्डे टाळण्याच्या नादात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होतात. सदर रस्ता सावकी , खामखेडा, पिळकोस, भादवन ,विसापूर आदी परिसरातील शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे. कारण या रस्त्यावरून शेतकरी आपला शेतीमाल देवळा, चांदवड,उमराणे, पिपळगाव आदी मार्केट मघ्ये विक्र ीसाठी नेत असतो. खड्ड्यांचा रस्ता असल्याने शेतमालाने भरलेली वाहने हळूवार गतीने न्यावी लागतात, त्यामुळे अधिक इंधनाचा भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतो. काही वेळेस या रस्त्याने जाताना होणाºया विलंबामुळे शेतकºयांचा माल वेळेवर बाजार समित्यांपर्यंत पोहचत नसल्याने शेतकºयांचे नुकसान होते. यासाठी सदर रस्त्याची लवकर दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडूनही केली जात आहे.
सावकी-विठेवाडी रस्त्याची दूरवस्था बनली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 4:04 PM