सटाणा : शहरातील मालेगाव रोडवरील सटाणा बाजार समिती समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल २३ लाख १२ हजार रु पयांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरूवारी (३०) सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीने सर्वत्र खळबळ आहे.दरम्यान, चोरट्यांनी शहरातीलच बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीम देखील गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला .नुकतीच दसाणे येथील दरोड्याची उकल करण्यात सटाणा पोलिसांना यश आलेले असतांना एटीएम फोडून लाखो रु पयांची लुट करणाºया टोळीचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान सटाणा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.बागलाण तालुक्यात एटीएम फोडून लाखो रु पये लुटल्याची ही पहिलीच घटना आहे. सुरक्षा रक्षकांविना असुरक्षित असलेल्या एटीएम मशीन्सला आता चोरट्यांनी लक्ष केल्याने बँकांची सुरक्षादेखील आता धोक्यात आली आहे.सटाणा शहरात स्टेट बँकेचे चार एटीएम मशीन्स असून त्यापैकी मालेगाव रोड येथील बाजार समतिीच्या प्रवेशव्दारासमोर एक एटीएम मशीन आहे.या एटीएम मशीन्स मध्ये कॅश भरण्याचे काम ब्रिंक इंडिया प्रा.लिमिटेड ही कंपनी करते.आज सकाळी हे एटीएम बंद असल्याची आॅनलाईन माहिती ब्रिंक इंडिया प्रा.लिमिटेड च्या मुंबई कार्यालयाला प्राप्त झाल्याने त्यांनी एजन्सीचे आॅपरेटर योगेश वैद्य आणि एटीएम आॅपरेटर सतीश रौंदळ यांना तत्काळ एटीएम केंद्रावर भेट देण्याचा आदेश दिला. आज सकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी या कर्मचाºयांनी एटीमला भेट दिली असता एटीएमचे समोरील व्हॉल्ट दरवाजा गॅस कटरने कापलेले दिसले.एटीएम मशीन फोडल्याचे निदर्शनास येताच दोन्ही कर्मचार्यांनी सटाणा स्टेट बँकेचे कॅश आॅफिसर लक्ष्मण करवाडे यांना घटनेची माहिती दिली.करावडे यांनीही तत्काळ सटाणा पोलिसांशी संपर्क साधून एटीएम केंद्र गाठले.एटीएम मशीनची क्लोझंिग शिल्लकची आॅनलाइन माहिती घेतली असता ५०० रुपयांच्या ४२७२ नोटा तर १०० रु पयांच्या १७५० अशी एकूण २३ लाख ११ हजारांची रोकड एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.याप्रकरणी सटाणा पोलिसांत स्टेट बँकेचे कॅश आॅफिसर करावडे यांनी दिलेल्या तक्र ारी नुसार अज्ञात चोरट्याविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.सटाणा स्टेट बँकेचे एटीएम फोडून २३ लाखांची रोकड लुटल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम जवळ वळविला.हे एटीएम देखील गॅस कटरने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. दरम्यान, सटाणा पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरु वात केली असून मालेगावरोडच्या एटीएम केंद्राबाहेर पोलिसांचे पथक दाखल झालेले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
सटाण्यात एसबीआयचे एटीएम फोडून २३ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 5:35 PM