पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथे काल सायंकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशा धुमाकूळ घालत सुमारे पंधरा सोळा नागरिकांना तसेच चार दुभत्या जनावरांना चावा घेतला आहे. यातील तीन जण गंभीर जखमी झालेअसून त्यांच्यावर येवला व नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात उपचार सुरु आहे.पाटोदा गाव व परिसरात शेकडो मोकाट कुत्रे असून ते गावात घोळक्याने फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.सायंकाळच्या सुमारास पाटोदा येथील बस स्थानक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत बस स्थानकावरील नागरिकांना जोरदार चावे घेण्यास सुरु वात केली. यात सुशांत शांताराम पगारे, आनंदा एकनाथ परपते, एक राजस्थानी कामगार (नाव समजू शकले नाही) हे तीन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येवला व नाशिक येशील शासकीय रु ग्णालयात उपचार केले जात आहे.याच ठिकाणी बसची वाट पाहत बसलेल्या तीन चार महिला काही नागरिकांना या पिसालेल्या कुत्र्याने लचके तोडले आहे. या महिला व नागरिक बाहेरगावचे असल्याने ते आपल्या गावी गेल्याने त्यांची नावे समजू शकली नाही.नागरिकांनी मोठया प्रमाणात आरडाओरड करून व काठ्या तसेच दगडगोटे फेकून मारल्याने या कुत्र्याने येथून पळ काढला. त्यानंतर त्याने प्रकाश बोराडे यांच्या शेतवस्तीवर वळवून तेथे झाडाखाली बांधलेल्या चार जनावरांना चावा घेतला आहे. त्यामुळे पाटोदा गाव व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.पाटोदा गाव परिसरात मोठया प्रमाणात मोकाट कुत्रे असून त्यांनी गावात दहशत निर्माण केली आहे. शिर्र्डी येथील हि भटकी कुत्रे या भागातील जंगलात आणून सोडली जात आहे, त्यामुळे हे कुत्रे भक्षाच्या शोधात हिंडत असून ते शेळ्या, बकऱ्यांना आपले भक्ष करीत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.- विलास पगारे, पाटोदा. (फोटो २४ सुशांत पगारे)
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 7:58 PM
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथे काल सायंकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशा धुमाकूळ घालत सुमारे पंधरा सोळा नागरिकांना तसेच चार दुभत्या जनावरांना चावा घेतला आहे. यातील तीन जण गंभीर जखमी झालेअसून त्यांच्यावर येवला व नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात उपचार सुरु आहे.
ठळक मुद्देपाटोद्या : अनेक नागरिकांबरोबरच चार जनावरांना घेतला चावा