शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

नाफेडमध्ये घोटाळा; व्यवस्थापकीय संचालकांसह अकाउंटंटची उचलबांगडी

By दिनेश पाठक | Published: July 06, 2024 12:30 AM

केंद्रीय कृषी समितीसह अध्यक्षांकडून अहवाल; एनसीसीएफचे अधिकारी मोकाटच

 केंद्र शासन अंगीकृत नाफेडसह एनसीसीएफ संस्थेत कांदा खरेदीत घोटाळा झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असल्याने नाफेडचे दिल्लीतील सहायक व्यवस्थापकीय संचालक (ए.एम.डी) सुनीलकुमार सिंग, तसेच नाफेडच्या नाशिक कार्यालयातील अकाउंटंट (लेखापाल) हिमांशू त्रिवेदी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सुनीलकुमार यांच्याकडून कांदा विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, हिमांशू यांची नाशिकहून मुंबईच्या कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी पथक चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात असून, त्यांनीच केंद्राला अहवाल देऊन कारवाईचे सूचित केल्याचे वृत्त आहे. नाफेडच्या अध्यक्षांनीही २१ जून रोजी कांदा खरेदी केंद्रांवर धाड मारली होती.नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना मात्र अजून तरी अभय देण्यात आले आहे. नाशिकसह राज्यभरातील नाफेडसह एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांत घोटाळा झाला असल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने मागील सहा दिवसांपासून केंद्रीय कृषी समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. समितीने अचानक दौरा करत नाफेडच्या दिंडोरीसह अन्य कांदा खरेदी केंद्रावर तपासणी केली होती. त्यात शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी आलेला कांदा व तेथे एकूण दाखल कांदा यात मोठी तफावत आढळून आली होती, तसेच इतर गैरबाबीही प्रकर्षाने जाणवल्या होत्या. त्या अनुषंगाने समितीने आपला अहवाल केंद्राला पाठविला. त्याचमुळे सुनिलकुमार व हिमांशु त्रिवेदी यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली. मात्र यात अजून काही अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नाफेड व एनसीसीएफने यंदाही देशभरातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी १४ ते १५ कांदा खरेदी केंद्रे सुरू केली होती. राज्यातील अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, शिरूर, बीड या ठिकाणीदेखील कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु देशभरातील खरेदी केंद्रांवर गोळा होणाऱ्या कांद्यांपैकी ८० ते ८५ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्यात येणार होता. अन् याच खरेदी व्यवहारात गफला होत असल्याची ओरड सातत्याने होत होती.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार