नाशिक : ‘गुन्हा करने के सौ तरीके होते है, और पकडे जाने के एकसौ एक’ असे नेहमी सांगितले जाते़ मात्र, इंदिरानगरमधील एका बंगल्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एकही पुरावा मागे कसा राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ चोरट्यांनी घरातील फरशीवर उमटलेल्या पाऊलखुणा, कपाटावरील हाताचे ठसे पोलिसांना मिळू नयेत यासाठी स्वच्छ कपड्याने पुसून ते कपडे धुऊन वाळत घातल्याची घटना घडली आहे़इंदिरानगरमधील गजानन महाराज मंदिरामागील सिद्धिविनायक सोसायटीत राजेंद्र वाणी कुटुंबीयांसह राहतात़ त्यांच्या भाचीचा रविवारी (दि़१५) पनवेल येथे विवाह सोहळा असल्याने ते कुटुंबीयांसह शुक्रवार (दि़१३) पासूनच पनवेलला गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज तोडून बेडरूममधील कपाट तोडून त्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, साड्या, नवीनच खरेदी केलेला मोबाइल, असा एक लाख ३७ हजार ९० रुपयांचा ऐवज चोरून नेला़रविवारी विवाह सोहळा आटोपल्यानंतर त्यांची मुलगी श्यामल घरी आल्यानंतर घरात घरफोडी झाल्याचे समोर आले़ याबाबत इंदिरानगर पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट पाहणी केली़याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पुरावे मिटविण्यासाठी घराची साफसफाईबेडरुमच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ पावसाळी वातावरणामुळे चिखलाने भरलेले पाय तसेच कपाटावरील हाताचे ठसे पोलिसांना मिळू नयेत यासाठी चोरट्यांनी चोरीनंतर घराची फरशी तसेच कपाट स्वच्छ पुसली़ तसेच यासाठी वापरलेले कपडे धुऊन बाहेर वाळतही टाकले तसेच जाताना कुटुंबातील सदस्याची चप्पल घालून निघून गेले़ या चोरट्यांनी घरातील कपाटाचे नुकसान तर केलेच शिवाय स्वयंपाकगृहातील सामानाचीही उलथा-पालथ केली़
पाऊलखुणा पुसत चोरट्यांची इंदिरानगरला घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:40 AM
नाशिक : ‘गुन्हा करने के सौ तरीके होते है, और पकडे जाने के एकसौ एक’ असे नेहमी सांगितले जाते़ मात्र, इंदिरानगरमधील एका बंगल्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एकही पुरावा मागे कसा राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ चोरट्यांनी घरातील फरशीवर उमटलेल्या पाऊलखुणा, कपाटावरील हाताचे ठसे पोलिसांना मिळू नयेत यासाठी स्वच्छ कपड्याने पुसून ते कपडे धुऊन वाळत घातल्याची घटना घडली आहे़
ठळक मुद्देघरफोडीची अजब क्लृप्ती हाता-पायाचे ठसेही मिटविलेसोन्याचे दागिने, रोख रकमेची चोरी