नाशिक : शासन दरबारी टॅँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले असले तरी तहसीलदारांकडून टॅँकर सुरू करण्यासाठी पाठविलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून राहतात. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रात्रीचे भारनियमन टाळल्यास दुष्काळामुळे होणाऱ्या चोऱ्या थांबतील यांसह अनेत तक्रारींचा पाढाच टंचाई बैठकीत जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर वाचला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यातही पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असताना अधिकार दिलेले असूनही तहसीलदार टॅँकर मंजूर करीत नसल्याचा आरोप जिल्ह्णातील आमदार-खासदारांनी केला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी १९७२ नंतर प्रथमच असा भीषण दुष्काळ जिल्ह्णात पडला आहे. आता आदिवासी शेतकरीही कर्जबाजारी झाल्याने आत्महत्त्या करीत आहेत. तालुक्यात फिरून पाणीटंचाईबाबत माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, (प्रतिनिधी)तर आमदार0 राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, ११-१२ दिवस पुरेल इतकाच चारा सिन्नर तालुक्यात शिल्लक आहे. चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. भोजापूर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. आमदार दीपिका चव्हाण यांनी बागलाण तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, तहसीलदारांना अधिकार असतानाही टँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यात वेळ जातो, अशी टीका केली. आमदार जयंत जाधव यांनी तीच री ओढत टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असूनही प्रत्यक्षात टॅँकर मंजुरीस विलंब होतो. (प्रतिनिधी)सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे टंचाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आमदार निर्मल गावित यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, पाण्याची आवर्तने सोडण्यावर नियंत्रण हवे. तालुक्यातील पिके व रोपे पावसाअभावी वाया गेली आहेत. आमदार रशीद शेख यांनी सांगितले की, मालेगाव तालुका व शहरासाठी पाण्याचे नियोजन गिरणा धरण व चणकापूर धरणातून करण्यात यावे, चणकापूर धरणातील पाणी मालेगावसाठी राखीव ठेवावे,अशी सूचना केली. आमदार पंकज भुजबळ यांनी चांदवड, येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. मनमाडच्या पाणीप्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वाघाड धरणातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडल्यास काही प्रमाणात प्रश्न सुटू शकणार आहे. त्यामुळे वाघाड धरणातून पाणी सोडण्याबाबत आवश्यक त्या सूचना यंत्रणेला देण्यात याव्यात, अशी मागणी केली. खासदार हेमंत गोडसे यांनी पाणी टंचाईबाबत प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच आवश्यक त्या गावांमध्ये पाणीटंचाई असल्यास टँकर सुरू करण्याची मागणी केली. आमदार देवयानी फरांदे यांनी सिंहस्थात २५ टक्के महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय असल्याचे सांगताच आमदार जयंत जाधव यांनी त्यांना हा प्रश्न बैठकीचा नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या भीषण असल्याचे खरे असले तरी पश्चिम पट्ट्यातही काही भागांत पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगितले. तसेच पाणी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असले तरी त्यात विलंब होत असल्याची तक्रार केली. तहसीलदारांना विचारल्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज असते, असे उत्तर देत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
उपाययोजना कागदावरचटंचाई
By admin | Published: September 11, 2015 1:06 AM