सिन्नर : मुसळगाव आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठा (लिक्विड ऑक्सिजन) बंद झाल्याने सिन्नरकरांवर ऑक्सिजन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांना त्याचबरोबर निफाड व नाशिकच्या काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सिन्नरच्या कंपन्यांनाच आता कच्चा माल मिळत नसल्याने टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. गणेश सांगळे, डॉ. अमोल मोरे, डॉ. विनोद घोलप, यश इंडस्ट्रीजचे संचालक अविनाश पोटे, स्टाइसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह डॉक्टर्सने तहसीलदार राहुल कोताडे यांची भेट घेऊन ऑक्सिजन व रेडमेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत चर्चा करीत निवेदन दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने सिन्नर तालुक्यात अनेक रुग्णांना बाधित केले आहे. सिन्नर शहरातील सुमारे आठ कोविड रुग्णालयात अनेक रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल मिळत नसल्याने ऑक्सिजन टंचाई भासू लागली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
इन्फो
रुग्णांचा जीव धोक्यात
शुक्रवारपर्यंत सिन्नर तालुक्यात ऑक्सिजनची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, शनिवारपासून काही तांत्रिक कारणास्तव पुरवठादारांनी पुरवठा थांबविला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेक खासगी कोविड रुग्णालयातील रुग्ण ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोट....
‘मुरबाड, मुंबई व पुणे येथून दररोज १० ते १२ टन लिक्विड ऑक्सिजन मिळत होता. त्यामुळे दररोज ऑक्सिजनचा रुग्णालयांना पुरवठा करण्यास कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र, शनिवारी केवळ ३ टन लिक्विड मिळाले. अगोदर लिक्विड ऑक्सिजन येथे मुसळगावच्या कंपनीत पोहोच मिळत होते. आता नाशिकला जाऊन लिक्विड ऑक्सिजन घेऊन यावे लागले. दुपारी एक नंतर तर उत्पादन घेणे बंद झाले आहे.
- अविनाश पोटे, संचालक, यश इंडस्ट्रीज
फोटो - २४ सिन्नर ऑक्सिजन
सिन्नर तालुक्यात ऑक्सिजन व रेडमेडिसिवर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. गणेश सांगळे, डॉ. अमोल मोरे, डॉ. विनोद घोलप, यश इंडस्ट्रीजचे संचालक अविनाश पोटे, स्टाइसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे आदी.
===Photopath===
240421\24nsk_22_24042021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ सिन्नर ऑक्सीजन सिन्नर तालुक्यात ऑक्सीजन व रेडमेडिसिवर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. गणेश सांगळे, डॉ. अमोल मोरे, डॉ. विनोद घोलप, यश इंडस्ट्रीजचे संचालक अविनाश पोटे, स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे आदि.