येवला : तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी कचरू शेलार यांनीही टोमॅटे पीक उपटून टाकले आहे. शेलार यांनी एक एकरात टोमॅटे पीक घेतले होते. शेत तयार करणे, रोप, लागवड, औषध व मजूर असा सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक खर्च केला. सुरुवातीस ३० कॅरेट, ५० रुपयांप्रमाणे विकल्या गेले. मात्र त्यानंतर बाजारात टोमॅट्याचे भाव कोसळले. कवडीमोल बाजारभावात वाहतूक व काढणी खर्चही निघत नसल्याने शेलार यांनी टोमॅटे पीक उपटून फेकले.
टोमॅटेचे वाढती आवक व कोसळलेल्या बाजारभावामुळे घरातून वाहतूक व काढणी खर्च भरण्यापेक्षा ग्रामीण भागात टोमॅटे पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पीक उपटून फेकणे पसंत केले आहे. दरम्यान, टोमॅटे पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
(०८ विखरणी)
080921\08nsk_35_08092021_13.jpg
टमाट्याला योग्य भाव मिळत नसल्याने षतातील पिक उपटून फेकताना शेतकरी.