नाशिक : शेवगेदारणा शिवारातील एका गोठ्यात दीड वर्षाच्या नर बिबट्यावनविभागाच्या पथकाला रेस्क्यू करताना मृतावस्थेत शुक्रवारी (दि.१८) दुपारी आढळून आला. बछड्याच्या मानेवर एका बाजूने मोठी जूनी जखम आढळली. भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारा जखमी बछड्यावर उपासमार ओढावून त्याला गोठ्यातच प्राण सोडावे लागले.पुणे महामार्गावरील पळसे गावापासून पुढे शेवगेदारणा शिवारात ढोकणे मळ्यामधील एका गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे दीड ते दोन वर्षांचा बिबट्याचा बछड्याने प्रवेश केला. पहाटेच्या सुमारास गोठ्यात बछडा असल्याचे लक्षात येताच तेथील मजूरांनी गोठ्याचे द्वार भीतीपोटी बंद करून घेतले. घटनेची माहिती सकाळी वनविभागाला मिळताच नाशिक पश्चिम कार्यालयातून रेस्क्यू वाहनासोबत असलेले पथक तसेच सिन्नर वनपरिक्षेत्रातील गस्त पथक घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, रवींद्र वाडेकर, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक राजेेंद्र ठाकरे, गोविंद पंढरे, दिनकर खारके, रेस्क्यू वाहनचालक प्रवीण राठोड यांनी सर्व अत्यावश्यक साधनांसह घटनास्थळ गाठले. यावेळी मळ्यातील गोठ्यात जाऊन बघितले असता बिबट्याची कुठल्याहीप्रकारची हालचाल दिसून आली नाही. तसेच उग्रवास येऊ लागल्याने वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला बिबट्या मृत झाल्याचा संशय आला. एका अडगळीच्या जागेत बछडा निपचीत पडलेला होता. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी गोठ्यात प्रवेश करून बछड्याला अडगळीतून बाहेर काढले असता मृतावस्थेत असल्याची खात्री पटली. बछड्याचे शव वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत तत्काळ रेस्क्यू वाहनातून नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात हलविले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अशोकस्तंभ येथील शासकिय पशु वैद्यकि य उपचार केंद्रात पशुवैद्यकिय अधिका-यांनी बछड्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
शेवगेदारणा : गोठ्यात शिरलेला बिबट्या ‘रेस्क्यू’त आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 5:48 PM
पहाटेच्या सुमारास गोठ्यात बछडा फिरत असल्याचे लक्षात येताच तेथील मजूरांनी गोठ्याचे द्वार भीतीपोटी बंद करून घेतले.
ठळक मुद्देपशुवैद्यकिय अधिका-यांनी बछड्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेअडगळीच्या जागेत बछडा निपचीत पडलेला होताबछड्याच्या मानेवर एका बाजूने मोठी जूनी जखम