नाशिक : तब्बल दहा महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध्ये चैतन्य सळसळू लागले. नवीन वर्षातील आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून भरलेल्या नववी, दहावीच्या वर्गांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या वर्गांनी सर्व शाळा, कॉलेजेसचा परिसर सोमवारी (दि.४) पूर्वीप्रमाणेच गजबजून गेला होता. पी. ई. स्कूलमध्ये औक्षण n नाशिकरोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वाग करण्यात आले. बालवाडी किंवा पहिलीच्या वर्गात प्रथमच शाळेत येणाऱ्या नवागत बालकांप्रमाणे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचेदेखील स्वागत करण्यात आाल्याने शाळेत येण्यास मिळाल्याचा आनंद व्दिगुणित झाला होता. त्यांचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वहात होता. नियमावली पालनाचे बंधन n शाळा सुरू करताना सर्व शाळांनी त्यांना घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करतानाच सर्व विद्यार्थी व पालकांनीदेखील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही शाळेत मधली सुट्टी दिली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच पाण्याची बाटली आणणे, शाळेच्या आवारात फिरायचे नाही, शाळा सुटल्यावर थेट घरी जायचे हे सर्व नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.प्रारंभी केवळ तीन तास शाळाn शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून केवळ सकाळी ८ ते ११ इतकाच काळ शाळा सुरू राहणार आहेत. उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी सर्व विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याच्या तयारीत आहेत.
दहा महिन्यांनी वाजली शाळेची घंटा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 12:45 AM
तब्बल दहा महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध्ये चैतन्य सळसळू लागले.
ठळक मुद्देदक्षता आणि स्वागत : पालकांचे संमतीपत्र बंधनकारक; काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण