बंडू खडांगळेलखमापूर : आधुनिक काळात शिक्षण पध्दतीची कार्यप्रणाली बदलत असुन, शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल घडले आहेत. त्यांचा परिणाम काही वस्तू नामशेष झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जेथून शिक्षणांचा श्री गणेशा झाली. ती खापरांची पाटी आता नामशेष झाली आहे.शाळा सुटल्यावर ‘शाळा सुटली पाटी फुटली’ असं गाणं विद्यार्थी शाळेकडे पाहत गुणगुणत असत. परंतु काळाच्या ओघात ही काळी खापरांची पाटी गायब होऊन तिची जागा पत्रा, कार्डबोर्डची पाटी किंवा मॅजिक स्लेटने घेतली, त्याहीफश्यावापरातयेतनसल्याचे दिसून येते. यामुळे सध्या शाळेतील मुलांना खापरांची पाटी काय आहे तेच माहीत नाही.शिक्षणाची सुरु वात करावयाची म्हणजे खापरांच्या पाटीवर श्री गणेशा लिहायचे, त्यावर गिरवायचे पाटीवर सरस्वती रेखाटून त्या पाटीची पुजा केली जात असे. किमान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये पाटीव खडू असायचा. त्याच बरोबर लिहिलेले पुसण्यासाठी कापड असायचे. घरी पाटीवर लिहिलेला गृहपाठ दुसऱ्या दिवशी शिक्षकांना दाखवून मगचं पुसला जायचा. लिहीलेला गृहपाठ पुसला जाऊ नये म्हणून यांची विशेष काळजी घेत पाटी जपून न्यावी लागत असे. परंतु काळाच्या ओघात हे सर्व संपले आहे. खापरांची पाटी एखाद्याच विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये पाहावयास मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.आता तीची जागा पुठ्ठा व पत्र्याच्या पाटीने घेतली आहे. त्यानंतर परत पाटीचे रूप बदलले. त्यात मणी असलेली आकर्षक पाटीही बाजारात आली. यामध्ये काही भागात मणी व काही भाग लिहिण्यासाठी होता. गणित शिकतांना या मण्यांचा उपयोग करता येत असे. सध्या काही मुले मॅजिक स्लेटचा उपयोग करतात. या मॅजिक स्लेटवर आपण आपल्या हाताच्या बोटांनी लिहु शकतो. त्यावर लिहिलेले पुसण्यासाठी स्पंज किंवा पाण्याची गरज नाही. फक्त लिहिलेला भाग थोडा वरती उचलला की त्यावरील अक्षरे गायब होतात. परंतु ही पाटी टाकाऊ व त्यावर लिहिलेले अक्षर चांगल्या पध्दतीने समजत नाही. असे अनेक पालकांचे मत आहे. तसेच विद्यार्थी वर्ग आता वही-पेनचा वापर करीत असल्यामुळे पाटी नामशेष झाली आहे. त्यामुळे आता खापराच्या पाटीची जागा मोबाईल, मॅजिक स्लेटने घेतली असली तरी खापरांच्या पाटीवर लिहिण्याची मजा काही वेगळीच होती.(फोटो १४ पाटी)
शाळेतील खापरांची पाटी नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 4:25 PM
लखमापूर : आधुनिक काळात शिक्षण पध्दतीची कार्यप्रणाली बदलत असुन, शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल घडले आहेत. त्यांचा परिणाम काही वस्तू नामशेष झाल्या आहेत. त्यातील एक म्हणजे जेथून शिक्षणांचा श्री गणेशा झाली. ती खापरांची पाटी आता नामशेष झाली आहे.
ठळक मुद्देलखमापूर : पाटीची जागा घेतली मोबाईल अन् मॅजिक स्लेटने