ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा स्काऊट गाईड शिबीर मारूतीचा मोढा परिसरात उत्साहात पार पडले.प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. क्रीडा शिक्षक एस. बी. ठुबे यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊट चळवळ स्थापने मागील उद्देश तसेच स्काऊटचे नियम व उत्तम स्काऊट व गाईड कसे असावे, याबद्दल मार्गदर्शन केले. आठवी ते दहावीच्या साडेचारशे विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वत: तंबू उभारले, स्वयंपाक करून विविध पाककृती तयार केल्या. यातून मुलांना श्रमाची प्रतिष्ठा, कष्टाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश सफल झाल्याचे प्राचार्य कवडे यांनी सांगितले.यावेळी रामनाथ शिंदे, पर्यवेक्षक बी. बी. पगारे, एस. ओ. सोनवणे, आर. डी. सांगळे, एस. एस. शेणकर, आर. सी. काकड, ए. बी. कचरे, वाय. एम. रूपवते, आर. पी. बागुल, आर. एम. मणियार, ए. एन. जगताप, डी. बी. दरेकर , आर .जी .मेंगाळ, ए. के. चव्हाण, आर. बी. दिवटे, व्ही. एस. वाघचौरे, एस. पी. रेवगडे, एल. बी. वायळ , एस. डी. सरवार, एम. डी. बोठे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
ठाणगाव विद्यालयाचे स्काऊट शिबिर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 6:49 PM