सायखेडा : शिक्षण हा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सृजन नागरिक करावे प्राथमिक शिक्षणापासून वंचीत ठेऊ नये असा कायदा शासनाने २००९ साली पारित केला असल्याने आपल्या शालेय परिसरातील एकही मूल शालेय शिक्षण घेण्यापासून वंचीत राहू नये म्हणून सायखेडा परिसरातील शिक्षक शाळा बाह्य मुलांचा शोध घेत आहेत.गोदावरी नदीचे खोरे असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आह,े ऊस तोडणी कामगार या कालावधीत दाखल होतात. मुबलक पाणी असल्याने वीट भट्टी व्यवसाय असून वीट भट्टी कामगार देखील येतात व्यवसायानिमित्त अशी कुटुंबे स्थलांतर होऊन परिसरात येतात त्यांच्या सोबत लहान मुले येतात पोटाची खळगी भरण्याच्या प्रश्नपुढे शिक्षणाचा प्रश्न अगदीच शुल्लक असल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडून या कुटुंबातील मुले आपल्या आईवडिलांबरोबर कामा निमित्त येतात अशा कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सायखेडा केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी मोहीम हाती घेतली असून ज्या ठिकाणी ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगारांचे तांडे दाखल झाले आहत्ेत अश्या ठिकाणी शालेय वेळेच्या व्यतिरिक्त वेळ काढून शिक्षक भेटी देऊन मुलांना, त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत आहे अशा शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.मुले शाळेत आल्यावर पोषण आहार, दप्तर, शालेय साहित्य मोफत मिळते तुम्ही नक्की पाठवा असे आवाहन करण्यात येत आहे. परीसरातील एकही मूल शाळाबाह्य रहाणार नाही असा चंग सायखेडा केंद्रातील शिक्षकांनी बांधला आहे.ऊस तोडणी कामगार यांना शिक्षणाचे महत्व पटत असून आपल्या प्रमाणे मुले आडाणी राहू नये म्हणून जवळच्या शाळेत प्रवेश घेत आहेत.चौकटप्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. कुटुंब स्थलांतर होत असल्यांने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, मात्र आम्ही प्राथमिक शिक्षक अशा मुलांच्या शिक्षणासाठी वाड्या वस्ती, तांडे यांना भेटी देऊन मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.- संतोष गायकवाड,प्राथमिक शिक्षक.
स्कुल चले हम....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 6:40 PM
सायखेडा : शिक्षण हा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सृजन नागरिक करावे प्राथमिक शिक्षणापासून वंचीत ठेऊ नये असा कायदा शासनाने २००९ साली पारित केला असल्याने आपल्या शालेय परिसरातील एकही मूल शालेय शिक्षण घेण्यापासून वंचीत राहू नये म्हणून सायखेडा परिसरातील शिक्षक शाळा बाह्य मुलांचा शोध घेत आहेत.
ठळक मुद्देशाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक तांड्यावर