सरकारी शाळेत शिक्षण घेतल्यास समाज काय म्हणेल? या विचाराने अनेक पालक मानसिक विवंचनेत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणत जुन्या काळी सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आता लोप पावत चालल्या आहेत की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. शासकीय शाळेत दिल्या जाणाºया शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची भावना जनमानसात रूढ झाली आहे. सामान्य माणसाला दुसरा पर्याय काय? अशी स्थिती आज आहे.याला नेमके जबाबदार कोण हा मुख्य मुद्दा असला तरी आज प्राथमिक शिक्षणापासून बोलणाºया शुल्काचे आकडे या शब्दाला सरकारचा अंकुश का नाही हा प्रमुख मुद्दा आहे.आज सरकारच्या शाळांमध्ये सुविधांचा अभाव असताना सामान्य पालकांना आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत.अनेक ठिकाणी पालक बोलताना त्याचा मुलगा त्या शाळेत आहे म्हणून आपला पण तेथेच टाका अशी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे नवरा- बायकोचे मतभेददेखील होत आहेत.नाशिकसह अनेक ठिकाणी फी व्यतिरिक्त बस, गणवेशसह वह्या-पुस्तके आमच्या येथूनच घ्यायच्या अशी अट घातली जाते. यातून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते. हल्ली मुलं गल्लीत खेळतानादेखील शाळेवरून त्यांच्यात भेदभाव होत आहेत. याला नेमकं जबाबदार कोण? हा मुख्य प्रश्न असताना सरकारी शाळेतील आजची अवस्था पाहता खासगी शाळांचे फावते असेच म्हणावे लागेल.खरेतर वाढलेल्या प्रचंड महागाईने आधीच सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना आजच्या परिस्थितीत पालक म्हणून त्याला वर्षभर कमाविलेली मोठी पुंजी पाल्याच्या शिक्षणासाठी खर्च करावी लागत आहे. आज अनेक ठिकाणी पहिलीच्या वर्गातील फी लाखाच्या घरात आहे. येणाºया काही वर्षांमध्ये अजून यात मोठे बदल होतील अशा वेळेला गरीबाच्या मुलाने कौलारू गळक्या शाळेतच मुलाचे भविष्य पाहायचे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शाळांचे शुल्क आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 7:52 PM
सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : बाकड्यावर नाही तर आकड्यावर शाळेचा दर्जा ठरत असल्याने दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्याला टाकणे ही काळाची गरज ठरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारी अनास्थेमुळे खासगी शाळांच्या फी चे आकडे सामान्य माणसांना न परवडणारे झाले आहेत.
ठळक मुद्देआजचे पालक आपल्या मुलांना शाळेत टाकताना पहिलीच्या वर्गातील फी पन्नास हजार रुपये भरतोय हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.