सिन्नर : जिल्हा परिषद शाळेत उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते, अशैक्षणिक कामे असतानाही जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात व जिव्हाळ्याने विद्यार्थ्यांना घडवतात, असे मत जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले.सिन्नर शहरातील गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वावाराच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, मंगेश परदेशी, विष्णू साबळे, सोमनाथ जाधव, राजेंद्र जाधव उपस्थित होते. नगरसेवक जाधव यांनी शालेय प्रगतीचा आलेख मांडला. मारूती आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक चिंधू वाघ यांनी आभार मानले. आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्लासरूमची पाहणी करून सांगळे यांनी समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून १ लाख ५० हजार रूपयांचा निधी उभारून शाळेला संरक्षक भिंत, प्रवेशद्वारे, विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे फिल्टर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे याबद्दल सांगळे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
लोकसहभागातून शाळेला प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 9:52 PM
सिन्नर : जिल्हा परिषद शाळेत उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते, अशैक्षणिक कामे असतानाही जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात व जिव्हाळ्याने विद्यार्थ्यांना घडवतात, असे मत जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देलोकसहभागातून १ लाख ५० हजार रूपयांचा निधी