रामदास शिंदे ल्ल पेठविद्यार्थ्यांना शाळा सोडल्यानंतर देण्यात येणाऱ्या दाखल्याचा नमुना राज्यभर एकच ठेवण्यात येणार असून, विद्यार्थी दाखल नोंद असणाऱ्या जनरल रजिष्टरचा नमुन्यातही बदल करण्यात आला आहे. आता दाखल्यावर आधार कार्ड, विद्यार्थी नोंदणी क्रमांकही शाळांना टाकावा लागणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा-नुसार राज्यातील सर्व शाळांतील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंद वही नमुन्यात सुधारणा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. शाळा सोडल्याबद्दच्या दाखल्यांचा नमुना एकच असावा, अशी मागणीही संघटना व स्वयंसेवी संस्थांनी केली होती. त्यानुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील शाळेचा दाखला एकसारखाच एकाच नमुन्यामध्ये असावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयातून नवा नमुना जाहीर केला आहे. शासन निर्णयात दिलेल्या नमुन्यानुसारच शाळांनी आपले दाखले व नोंदवहींची छपाई करून घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर नव्याने आता शाळांना त्या विद्यार्थ्यांचा आधार क्र मांकही नोंद करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा सोडताना असलेल्या वर्गाचा आयडी क्रमांक नोंदवणेही शाळेच्या दाखल्यावर सक्तीचे करण्यात आले आहे. या संदर्भातील सूचना उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी राज्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत.
शाळा सोडल्याचा दाखला आता एकसमान
By admin | Published: September 24, 2016 12:38 AM