-----------------------
दापूर येथे १,७०० नागरिकांचे लसीकरण
सिन्नर : तालुक्यातील दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १,७०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, व्यावसायिक, फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. लसीकरण शांततेत, शिस्तबद्धरीत्या पार पडले. डॉ.नितिन म्हस्के, डॉ.राहुल हेंबाडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, सरपंच रमेश आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, राजू आव्हाड, समाधान आव्हाड, म्हाळू गामणे, नंदू आव्हाड, अरुण आव्हाड आदी उपस्थित होते.
-------------------
शहीद जवान राकेश आणेराव यांना अभिवादन
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथे शहीद जवान राकेश आणेराव यांना १६व्या स्मृती दिनी अभिवादन करण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, कारगील योद्धा मेजर दीपचंद यांनी शहीद जवान राकेश आणेराव यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरपंच रामनाथ शिंदे, उपसरपंच नामदेव वारुंगसे, व्ही.राजे ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल उगले, मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, श्रीराम पतसंस्था चेअरमन भाऊसाहेब शिंदे, दशरथ काळुंगे, संदीप ढोकणे, राजेंद्र आहेर, रामनाथ डावरे, माजी सैनिक संघटनेचे विजय कतोरे, विश्वास लोखंडे, आणेराव कुटुंबाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.