सिन्नर : कोरोना महामारी दरम्यान पालकत्व हिरावल्याने निराधार झालेल्या सोनांबे येथील तीन कुटुंबातील सहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सोनांबे येथील जनता विद्यालातील कार्तिकी डगळे, अनुशूल डगळे, यश पवार, अस्मिता पवार, सपना शिंदे, अमित शिंदे या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब सिन्नर सिटीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये शालेय गणवेश, दप्तर, वह्या, कंपास, शूज, छत्री आदी वस्तूंचा समावेश होता. हेमंत वाजे, सरपंच डॉ. पवार, अनिल पवार, टी. आर. पवार, बी. एम. पवार, डॉ. प्रशांत गाडे, हिरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय सानप, सोपान परदेशी, कल्पेश चव्हाण, डॉ. जितेंद्र क्षत्रिय, एकनाथ पवार, संतोष डगळे, सोमनाथ पवार, रामनाथ शिंदे, दीपक जगताप, समाधान बोडके आदींसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मविप्र संस्थेचे संचालक हेमंत वाजे यांच्या हस्ते दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कार्तिक पवार, पल्लवी काळुंगे, मानसी डावरे, अभय माळी, नम्रता वाकचौरे आदींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच मविप्र संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
--------------------
सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथे निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देताना मविप्रचे संचालक हेमंत वाजे, लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे पदाधिकारी. (१३ सिन्नर २)
130821\13nsk_19_13082021_13.jpg
१३ सिन्नर २