सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या १९९६ इयत्तेतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल दोन तपानंतर स्नेह मेळा भरला. जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारत माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली.१९९६ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बारागाव पिंप्री येथील डी. एस. फार्म येथे पार पडला. पंकज जाधव यांच्या संकल्पनेतून मोजक्याच संपर्कात असणाऱ्या मित्रांनी डिसेंबर महिन्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून एक ग्रुप तयार केला. आणि महिनाभरात त्या गु्रपमुळे एकमेकांच्या संपर्कात नसलेले तब्बल २४ वर्षानंतर एकत्र आले. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, इतकेच नव्हे तर दुबई, श्रीलंका या ठिकाणी आपल्या व्यवसायानिमित्त असलेले मित्रही या स्नेह मेळाव्यात एकत्र भेटले. एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या भावना अनेकांनी बोलून दाखवत आपल्या जुन्या आठवनींना उजाळा देताना अनेकांना गहीवरुन आले.या बॅचला शिकविणाºया सर्व शिक्षकांना यावेळी बोलविण्यात आले. त्यात शेळके, निकम, चव्हाण, जाधव, गुजराथी, शिंदे, वाळुंज, पवार, श्रीमती कानवडे या शिक्षकांच्या प्रती ऋण व्यक्त करताना सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला. शिक्षकानीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेश उगले, सुभाष उगले, कैलास ताडगे, किशोर जाधव, प्रवीण सानप, प्रकाश उगले, मधुकर तुंगार, विनायक जेजुरकर, सोपान गोडगे यांच्यासह वर्गमित्रांनी सहकार्य केले. सोपान उगले यांनी प्रास्ताविक केले तर दशरथ रोडे यांनी सूत्रसंचालन केले.
दोन तपानंतर भरली आठवणींची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 1:11 PM