नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणीप्रश्नही विद्यार्थ्यांनी सोडविला.अस्वली येथील जनता विद्यालयाच्या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी एक हजार लिटर क्षमता असलेल्या दोन टाक्या व एक छोटे जलशुद्धीकरण यंत्र असे साहित्य भेट स्वरूपात दिले. इतर माजी विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे माजी विद्यार्थी नामदेव धोंगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती एस.आर. जगताप यांनी माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी विलास मुसळे, नामदेव धोंगडे, डॉ. नरेंद्र सिंग, भाऊसाहेब तांबे, सुदाम धोंगडे, नंदू धोंगडे, रामभाऊ गव्हाणे, बाळू भोर, उत्तम भोर, रामनाथ गुळवे, भाऊसाहेब गुळवे, प्रकाश गुळवे, तानाजी गुळवे, आदी उपस्थित होते.एकत्र स्नेहभोजनमाजी विद्यार्थिनी मनीषा गायकवाड व अनिता कासार यांनी आपल्या घरून करून आणलेले पदार्थ मुख्याध्यापक श्रीमती जगताप यांना दिले. एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटत पुन्हा एकदा एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कायमस्वरूपी व सर्वांच्या उपयोगी येईल, अशी वस्तू शाळेला भेट दिल्यामुळे आनंद व्यक्त केला.
माजी विद्यार्थ्यांनी सोडविला विद्यालयाचा पाणीप्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:09 AM
इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणीप्रश्नही विद्यार्थ्यांनी सोडविला.
ठळक मुद्देस्नेहमेळावा । जलशुद्धीकरण यंत्र भेट