नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष मोगल, मुरकुटे, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत शिंदे, मुख्याध्यापक पी. पी. लांडगे, उपाध्यक्ष कापडणीस उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पालखीचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन वैशाली सूर्यवंशी यांनी केले. घुले यांनी आभार मानले.सागरमल मोदी विद्यालयनाएसो संस्था संचलित सागरमल मोदी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकºयांची वेशभूषा केली होती. यावेळी अशोक शिरुडे, श्रीराम ठाकरे, अश्विनी पगार, मनीषा जोशी, किशोरी शुक्ल, उषा जोपळे, मंजूषा झेंडे, मनीषा कापसे, दीपाली पाटील, तेजश्री बुवा आदी उपस्थित होते.किड्स कॅम्पस स्कूल :एम. एच. फाउंडेशन संचलित किड्स कॅम्पस इंग्लिश मीडियम प्री-स्कूल वाढणे कॉलनी, प्रभातनगर, म्हसरूळ येथे आषाढी वारी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी वारकºयांची वेशभूषा केली होती. वैशाली कोतवाल यांनी संतांची माहिती सांगितली. विठुनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब हिरे, मुख्याध्यापक मनीषा हिरे, हिना भोये, सुनंदा मोजाड, अंजली कोळेकर, लक्ष्मण शार्दुल, वैशाली शार्दुल आदी उपस्थित होते.मखमलाबादला अभिनव शाळेत विठ्ठलाचा जयघोषअभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद शाळेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक सचिन पंडितराव पिंगळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे, संपतराव पिंगळे, संजय फडोळ, सुभाष पिंगळे व सर्व शालेय समिती सदस्य यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. मखमलाबाद गावातून मुलांनी पालखी मिरवणूक काढली. अनेक महिलांनी विठ्ठलाचे पूजन केले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांनी आभार मानले.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाची शाळा भरली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:38 AM