निफाड : तालुक्यात तब्बल ३० पदे रिक्तनिफाड : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ८२ मंजूर पदांपैकी ५२ मुख्याध्यापक कार्यरत असून ३० पदे रिक्त आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने २०१५ /१६ च्या पायाभूत पदानुसार १३ मे २०१६ ची समायोजनानंतरची स्थिती पंचायत समितीच्या मासिक सभेत समोर आली आहे. तालुक्यात १२८ पदवीधर शिक्षकांची गरज असताना १०४ शिक्षक कार्यरत असून २४ शिक्षकांची गरज आहे, उपशिक्षक ८५३ मंजूर असून २२ शिक्षकांची पदे रिक्त, तर केंद्रप्रमुखाचे एक पदही रिक्त आहे. सदरची पदे भरण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. पदोन्नतीने ही पदे लवकरच भरली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी सांगितले. मोफत गणवेश योजनेसाठी सन २०१६/१७ साठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत २० हजार ९२९ विद्यार्थी लाभार्थी असून प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे ८३ लाख ९६ हजार ४०० रुपयांची मागणी जिल्हा परिषदेकडे केली असल्याचे विस्तार अधिकारी व्ही.एन. गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)
मुख्याध्यापकाविना शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2016 11:53 PM