शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

शहरातील शाळांमध्ये दुमदुमला विठूनामाचा गजर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:30 AM

शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केले होती. तसेच टाळ, पिपळ्या व विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली.

नाशिक : शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केले होती. तसेच टाळ, पिपळ्या व विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली.  के. के. वाघ इंग्लिश स्कूल, डी.जी.पी.नगर येथे पूर्व प्राथमिक विभागात आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी मुख्याध्यापक चित्रा नरवडे, रविना पवार, तसेच सुरेखा नन्नावरे, सविता गोर्डे, संगीता गांगुर्डे, हिना पिरझादा यांचे मार्गदर्शन लाभले.सातपूरला वृक्षदिंडीसातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठुनामाच्या जयघोषात परिसरातून वृक्ष आणि ग्रंथदिंडीचे आयोजन करीत विविध घोषणा देत वृक्षलागवडीचा संदेश दिला आहे. विद्यार्थी विठ्ठलाच्या वेशात, तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशात उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले यांच्या हस्ते दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी चिटणीस प्रा. के. के. जाधव, संपत अहेर, नरेंद्र वाणी, तुकाराम शिंदे, शरद गांगुर्डे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे, पर्यवेक्षक सुदाम दाणे यांनी वृक्षलागवडीचे आणि आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले.  प्रास्ताविक संध्या जाधव यांनी केले. सूत्रसंचालन एस. टी. गिरी यांनी केले. साहेबराव कासव यांनी स्वागत केले. शोभा कदम यांनी आभार मानले.मेरी हायस्कूलच्या प्रांगणात रंगला दिंडी सोहळाज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकारामाच्या जयघोषात सीडीओ मेरी हायस्कूलमधील चिमुकल्यांनी जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल म्हणत रिंगण करीत दिंडी काढली व परिसरातील सर्व भाविक नागरिकांचे लक्ष वेधले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यवाह राजेंद्र निकम, पालक संघाचे कार्याध्यक्ष सचिन निरंतर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले, शोभा भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवीच्या बालगोपालांनी भक्तिगीते सादर केली, प्रास्ताविक आशा डावरे यांनी केले, सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. कल्पना जोपळे यांनी आभार मानले.शिशुविहार शाळेत दिंडी आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि.२०) शिशु विहार शाळेत पांडुरंगाची पालखी सजवण्यात आली होती. माधुरी गडाख, मुख्याध्यापक मानसी बापट, भाग्यश्री पाटोळे यांनी पालखीचे पूजन केले. सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगांच्या गजरात पांडुरंगाची विविध भजने म्हटली. शिक्षिका निशिता कुलकर्णी यांनी यावेळी आषाढी एकादशीची माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह सर्वांनी वृक्षारोपण केले.रेडियंट टोट्समध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीनाशिक : आषाढी एकादशीनिमित्त रेडियंट टायनी टोट्स चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकरी वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला. चिमुकले वारकरी तुळशीमाळ घालून टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखी घेऊन टाळांच्या गजरात सहभागी झाले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी शाळेच्या प्रांगणाभोवती फिरवली. फुगडीची साद व टाळ-मृदुंगाचा नाद यासोबत वातावरण दुमदुमून गेले. कार्यक्र माची सुरु वात शाळेच्या मुख्याध्यापक गीता व्यास यांच्या हस्ते विठ्ठल-रु ख्मिणी पूजनाने झाले. सूत्रसंचालन संगीता शर्मा व सोनाली पिंगळे यांनी केले. संगीत शिक्षिका क्षिप्रा बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांनी भक्तिगीत सादर केले.

टॅग्स :Schoolशाळा