नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाकडून २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी करण्याच येत असताना पालकांचा मात्र शाळा सुरू करण्यासाठी तीव्र विरोध होता. यासंदर्भात शिक पालक संघटनेने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या निवेदन देऊन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास प्रशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल केला होता. त्यानंतर शाळा शुरू करण्याबाबत निर्णय घेण्यसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी(दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हायातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवण्याची मागणी नाशिकमधील पालकांकडून करण्यात आली होती. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी पालकांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली असून, त्यामुळे पालकांकडून शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात अजूनही शासनाकडे पुरेशा सुविधा उपलब्ध नाही. शासनाच्या तुटपुंज्या यंत्रणा असताना खासगी रुग्णालयांचे उपचार सामान्यांना परवडणारेही नसल्याने अशा बिकट परिस्थितीत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू न करता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 1:13 PM
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देनाशकातील शाला 4 जानेवारीपर्यंच बंदचजिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठक कोरोनाचा प्रभाव, पालकांचा विरोध लक्षात घेऊन निर्णय