कळवण : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, विविध विज्ञान साहित्य हाताळून त्यांना स्वत:ला प्रयोग करता यावेत या उदात्त हेतूने कळवण तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विज्ञान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने गट साधन केंद्रांतर्गत १५ लाख रुपये खर्च करून हे विज्ञान केंद्र कार्यन्वित करण्यात आले असून, तालुक्यातील हे पहिले विज्ञान केंद्र ठरले आहे.
गणोरे जिल्हा परिषद शाळेत विज्ञान केंद्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:11 AM