शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

तारांगणजवळ सायन्स सेंटर उभारणार

By admin | Published: September 09, 2016 1:13 AM

समितीची बैठक : विज्ञानविषयक उपक्रमांचे आयोजन

नाशिक : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत सायन्स सेंटर उभारण्याचा निर्णय महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर तारांगण प्रकल्पात विज्ञानविषयक विविध उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.तारांगण प्रकल्पासंबंधी महासभेने समितीची स्थापना केली होती. या समितीची पहिली बैठक महापौरांच्या दालनात झाली. यावेळी तारांगणच्या मोकळ्या जागेत सायन्स सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. स्व. आमदार उत्तमराव ढिकले यांनी नाट्यगृहासाठी महापालिकेला सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु एवढ्या रकमेत नाट्यगृह उभारणे शक्य नसल्याने सदरचा निधी सायन्स सेंटरची इमारत उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी सदरचा निधी वर्ग करण्याकरिता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव देण्याचे ठरविण्यात आले. या सायन्स सेंटरमध्ये विज्ञानविषयक प्रकल्पांबरोबरच मुलांना आकर्षित करणारे विज्ञानविषयक खेळही असणार आहेत. तसेच टेरेसवर टेलिस्कोपही बसविण्यात येणार आहे. दरम्यान, तारांगण प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. दि. ४ ते १० आॅक्टोबरला जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तारांगणचे आधुनिकीकरण करणे, विज्ञानविषयक वाचनालय चालविणे आदिंबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, पश्चिम प्रभाग सभापती शिवाजी गांगुर्डे, पूर्व विभाग सभापती नीलिमा आमले, सातपूर प्रभाग सभापती सविता काळे, माकपा गटनेते तानाजी जायभावे, शहर अभियंता सुनील खुने, सल्लागार समितीचे सदस्य अपूर्वा जाखडी, ओमप्रकाश कुलकर्णी, अविनाश शिरोडे, जयदीप शाह आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)