शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

विज्ञानचा कटआॅफ घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:51 AM

विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यंदा विज्ञान शाखेचा कटआॅफ घटला असून, वाणिज्य शाखेसाठी कटआॅफ वाढल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या सुमारे १४,८४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शनिवार (दि.१३) रोजी पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देअकरावी गुणवत्ता यादी : वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी लागणार कस

नाशिक : विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यंदा विज्ञान शाखेचा कटआॅफ घटला असून, वाणिज्य शाखेसाठी कटआॅफ वाढल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या सुमारे १४,८४५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शनिवार (दि.१३) रोजी पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.महापालिकेला क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश यंदाही आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञानसाठीचे कटआॅफ घटला असून, शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ८७ ते ९१ टक्क्यांपर्यंत विज्ञानचे प्रवेश आले आहेत, तर वाणिज्य शाखेचा कटआॅफ ८१ ते ८७ दरम्यान राहिला. यंदा दहावीचा निकाल कठोर लागल्याने त्याचा परिणाम गुणवत्ता यादीवरही दिसून आला. मागीलवर्षी ९५ ते ९६ टक्क्यांवर असलेला विज्ञान शाखेसाठीचा कटआॅफ यंदा ८७ ते ९१ टक्क्यांवर आला आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी पहिल्या यादीनुसार २१,०२८ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली असून, त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४,८४५ इतकी आहे. अकरावीसाठी शहरातील ५९ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार इतक्या जागा असून, प्रवेशासाठी २५ हजार ६९० विद्यार्थ्यांनी भाग-१ मध्येअर्ज दाखल केले होते, तर भाग-२ मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१,०२८ इतकी होती.कला शाखेसाठी ४७९०, वाणिज्य शाखेसाठी ४४३०, तर विज्ञान शाखेच्या ९१९० जागांसाठंी अलॉटमेंट जाहीर करण्यात आली. एमसीव्हीसीच्या १३२० जागांसाठीदेखील कटआॅफ लिस्ट जाहीर करण्यात आली. पहिल्या दहा महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची नावे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. कला शाखेसाठी प्रथम दहा प्राधान्य क्रम नोंदविलेल्या २५६३, कॉमर्स ५६२९,सायन्स ६३९६ विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांसाठी सूचनाविद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी ल्लं२ँ्र‘.11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ल्ली३ या संकेतस्थळावर तपासावा. ४दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा४पसंतीक्रम क्रमांक १ अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम ‘स्टुडंट लॉगिन’ मध्ये जाऊन ‘प्रोसिड’या बटणावर क्लिक करणे गरजेचे आहे. तरच त्यांचे नाव कॉलेजच्या यादीमध्ये समाविष्ट होईल व त्यानंतर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश आॅनलाइन अपलोड करून प्रवेश समाविष्ट करावा व प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण