ठळक मुद्दे विज्ञान प्रदर्शन कक्ष १चे उद्घाटन गोविंद सीताराम अहिरे यांनी, कक्ष २चे उद्घाटन स्कूल कमिटी अध्यक्ष अरुण अहिरे यांनी, तर कक्ष ३ चे उद्घाटन शालेय व्यवस्थापन स मितीचे अध्यक्ष रत्नाकर सुदाम अहिरे यांनी केले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जेसीबी, क्लिनर, ऊर्जाबचत यंत्र, सोलर, सौरऊर्जा, पवनऊर्जा, ग्रहांची माहिती, वाहतुकीची साधने, प्लॅस्टिकपासून वीजनिर्मिती, आधुनिक सुरक्षित वाहन आदी विषयांवर उपकरणे मांडली होती.विज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात मानवी पचनसंस्था, मेंदूची रचना, मानवी हृदय, वनस्पती पेशी, स्पायरोगायरा, तापमापी, नालाकृती चुंबक आदी विविध प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी रेखाटल्या.शिक्षक रमाकांत भामरे, आर. डी.पवार यांनी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन सचिन शेवाळे यांनी केले. धीरज पवार यांनी आभार मानले.