कळवण : पंचायत समिती शिक्षण विभाग व कळवण तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रवळजी फाटा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल व सखूआई ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव, रामेश पाटील, महेंद्र हिरे, विश्वनाथ सोनवणे उपस्थित होते.दोनदिवसीय प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन प्रतिकृती सादर केल्या होत्या. परीक्षक म्हणून गोकुळ चव्हाण, वाय. पी. दाणी, व्ही.एम. सावंत, आर. बी. शेवाळे, एन. डी. भदाणे यांनी काम पाहिले. यावेळी विस्तार अधिकारी डी.ए. पवार, एस. डी. महाले, शीतल कोठावदे, बागुल, चव्हाण, बापू बहिरम, विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष विकास रौंदळ, एस. जी. सागर, शिक्षक समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष पी. के. आहेर, संस्थेचे सचिव योगेश शेवाळे, सुनील शेवाळे आदी उपस्थित होते. निवाणे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी विज्ञान व समाज या विषयावर नाटिका सादर केली. पांढरीपाडा शाळेतील शिक्षक भास्कर भामरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
कळवणला विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:32 PM