विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच संगीता सोनवणे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनासाठी अनेक दालने करण्यात आली होती. यामध्ये विविध उपकरणे, खेळणी, पोस्टर, प्रेझेंटेशन, वैज्ञानिक रांगोळी, व्यवसाय मार्गदर्शन, करिअर जत्रा, आनंद मेळावा इ. उपक्र म राबविण्यात आले. केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यांनी अंधश्रद्धा व विज्ञान यातील फरक सांगितला. कार्यक्र म यशस्वीतेसाठी ए. जे. म्हस्के, पी. व्ही. नलगे, पी. जी. ढवण, एस. एम. भोईटे, सरोदे यांसह शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त एसएसजीएम कॉलेजचे प्राचार्य किशोर काकडे यांचे व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी सल्लागार शिक्षण समिती अध्यक्ष माधवराव गटलुजी दरेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, सरपंच शकुंतला दरेकर, उपसरपंच संगीता सोनवणे आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक ए. पी. साळुंके यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य पी. टी. कापडणीस यांनी स्वागत केले. प्रमुख वक्ते प्राचार्य काकडे यांनी कर्मवीरांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोपीनाथ ढवण, माधवराव नारायणे, कैलास सोनवणे, सुनील मालपाणी, आत्माराम दरेकर, रत्नाकर दरेकर, नानासाहेब जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, किशोर मवाळ, नागू नेवगे, किशोर पाटील, शंकर दरेकर, युसुफखान पठाण, मदन पवार, एन. एम. खाडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे यांनी केले. (वार्ताहर)
कर्मवीर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
By admin | Published: September 27, 2016 11:47 PM