नाशिक : इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन, विविध प्रकल्पांचे सादरीकरण कर ण्यासाठी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये सहभागी होऊन तंत्रज्ञान संशोधनातून वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या दिव्यदृष्टीचे दर्शन घडवित विविध विषयांवरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. कर्मवीर काकासाहेब वाघ अभि यांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. २३)‘कर्मवीर एक्पो’चे उद्घाटन झाले. याप्रसंगी कोसे इंडियाचे संचालक गौरव गुप्ता व क्रॉम्प्टनचे के. ई. वायरस, अंतराळ अभ्यासक अपूर्वा जाखडी, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, प्राचार्य एन. के. नांदूरकर, डॉ. ओ. जी. कुलकर्णी, डी. एम. मेथीकर, अविनाश शिरोडे, डॉ. बी. ई. कुशारे उपस्थित होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक आविष्कार सादर केले. अंध, अपंग व्यक्तींना साहाय्यभूत ठरणाऱ्या विविध उपकरणांसोबतच वेगवेगळ्या पर्यावरणपूरक मार्गाने वीजनिर्मिती, जलशुद्धिकरण प्रकल्प, पर्यावरणपूरक वाहने, शेती क्षेत्रासाठी साहाय्यभूत ठरणारी उपकरणे, गायीच्या गोठ्याचे तपमान नियंत्रित करणारे उपकरण आदी तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कल्पक अणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विशेषत: ऊर्जा व जल व्यवस्थापनावर विशेष संशोधन करून राष्ट्राची प्रगती करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले. कर्मवीर एक्स्पोसारख्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मत उद्घाटनप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले.अंधांसाठी डिजिटल डोळ्यांचे तंत्रज्ञानबेंगळुरू येथील बीएनएमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘दृष्टी-व्हर्च्युअल आय’ प्रकाल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शमा एम. एस., हितेश व्ही. व संदेश एस. या विद्यार्थ्यांनी डिजिटल कॅमेरे व संगणकीय यंत्रणेच्या साह्याने वस्तू व परिसराची ओळख संकलित करून ती अंध व्यक्तीला सांगितली जाते. त्यामुळे अंध व्यक्तीला आपल्यासमोर कोण आले ते ओळखणे शक्य होईल, असा दावा विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून केला आहे. परंतु, संबंधित व्यक्ती अथवा परिसराची माहिती प्रथम संगणकात समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्यानंतर संगणक आपल्या आर्टिर्फिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून अंध व्यक्तीला काही महत्त्वाच्या कामासाठी दृष्टी देण्याचे काम करेल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.थ्रीडी प्रिण्टरविज्ञान तंत्रज्ञान हा केवळ अभियांत्रिकीचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांचा विषय नसून केवळ आवड म्हणूनही या क्षेत्रात संशोधन करणाºया अनेक व्यक्तींची उदाहरणे आहेत. असाच प्रयोग बीवायके महाविद्यालयातील फरदीन खान या विद्यार्थ्याने केला असून, त्याने वाणिज्य शाखेचे शिक्षण घेताना थ्रीडी प्रिंटर तयार केला आहे. या संशोधनामुळे विविध आकाराचे आकृतिबंध तयार करणे सोपे होणार असल्याचा दावा फरदीनने केला आहे.मानवी ऊर्जेतून वीजनिर्मितीबेंगळुरू येथील बीएनएमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी ऊर्जेतून वीजनिर्मिताचा प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानामुळे सायकल चालवताना उपयोगात येणाºया मानवी ऊर्जेतून वीजनिर्मिती करून त्यावर विजेचे दिवे लावण्यासोबतच बॅटरीच्या माध्यमातून पुन्हा सायकल चालवणेही शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे बॅटरीवर चालणाºया सायकलची बॅटरीही पेंडलच्या साह्याने पुन्हा चार्ज करता येणार असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.
‘कर्मवीर एक्स्पो’मध्ये वैज्ञानिक दिव्यदृष्टीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:35 AM