इगतपुरी : मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या स्कार्पिओ (क्रमांक एम एच ४३ ए १२१५) या वाहनाला कसारा घाट चढून आल्यावर तळेगाव शिवारात अचानक आग लागली. वाहनातून धूर निघत असल्याने चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली असता काही क्षणातच गाडीने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीत वाहन जळून खाक झाले. सुदैवाने वाहनातील चालकासह सहकारी बचावले आहेत.हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग सुरक्षा पोलिस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी येऊन जवळच असलेले महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.वाहन चालक सय्यद अब्दुल सलाम व सहकारी अकिब शेख, रा. कल्याण या दोघांनी सतर्कता दाखवल्याने दोघांचे प्राण वाचले. या घटनेदरम्यान मुंबईहून नाशिक कडे वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. महामार्ग पोलीसानी वाहतूक सुरळीत केली.या वेळी महामार्ग पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस अधीकारी माधव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील खाताळ, जितेंद्र विणकर, राहुल सहाणे, केतन कापसे , जयहरी गांगुर्डे, तसेच महिद्रा कंपनी अग्निशमन दलाचे सुरक्षा अधिकारी प्रतीक पांडे, अजय म्हसने, महेंद्र भटाटे, प्रदीप राजपूत ,केदार औधकार, अनिल शिंदे, नगरपालिका अग्निशमन दलाचे नागेश जाधव, कृष्णा गायकवाड आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
तळेगाव शिवारात आगीत स्कॉर्पिओ खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 9:00 PM
इगतपुरी : मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या स् कार्पिओ (क्रमांक एम एच ४३ ए १२१५) या वाहनाला कसारा घाट चढून आल्यावर ...
ठळक मुद्देमहामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प