पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या रोगांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागाकडून सुरू झाले आहेत, गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना असताना प्रशासनाने कडक उपाययोजना करीत तो आटोक्यात आणला. मात्र विषम वातावरणामुळे साथीचे रोग वाढत आहेत, त्यातच डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागील आठवड्यात शहरातील विविध भागात तब्बल ३५हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर छावणी परिषदेच्या रुग्णालयासह खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही संख्या वाढू नये यासाठी छावणी प्रशासनाकडून दखल घेऊन आरोग्य विभागाने स्वच्छता अभियानाबरोबर डेंग्यूची जनजागृती करण्यासाठी माहिती देणारी पत्रके नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहेत. तसेच बाजार परिसरात असलेल्या विविध दुकानांचे आजूबाजूला पडलेले जुने टायर जमा करण्यात आले आहेत.
देवळालीत डेंग्यूचा कहर; नागरिक भयभयीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 4:05 AM