सिन्नर : येथीले शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात स्काउट-गाइडचा आनंदमेळा उत्साहात पार पडला.मविप्रचे समिती सदस्य डॉ. विजय लोहारकर, भाऊसाहेब गोजरे, पी. डी. जाधव, बी. टी. नवले, भाऊसाहेब पानसरे यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध स्टॉल्सवरील पदार्थांचा आस्वाद घेतला.स्काउट-गाइड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ यांनी प्रास्ताविक केले. आनंद मेळ्यातील स्टॉल लावलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेवर व्यवसायाचे ज्ञान अनुभवले व स्वकमाईचे समाधान या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले. आनंदमेळ्याचे नियोजन एस. बी. चांदोरे, आर्वी वाजे, एम. बनकर, वाय. ए. मोरे, एम. आर. कर्डिले यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानदेव नवले, एन. ए. सोनवणे, वैशाली वाजे आदींनी परिश्रम घेतले.
शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात स्काउट-गाइड आनंदमेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:51 IST