शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

मानूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Published: May 31, 2017 12:36 AM

दहशत : पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील मानूर (पाडगण शिवार) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने कारभारी पुंडलिक पवार यांच्या मळ्यातील राहत्या घराजवळील गोठ्यातील म्हशीच्या पारडाचा फडशा पाडला असल्याने शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी, शेतमजूर हे बिबट्याच्या वास्तव्याने धास्तावले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून सदर बिबट्या हा जेरबंद करावा, अशी मागणी मानूर येथील शेतकरी बांधवांकडून व पशुपालकांकडून होत आहे.परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण दोन वर्षापासून वाढले असल्याने या कालावधीत मानूर परिसरातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी व मेंढपाळ बांधवांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. परिसरात पुन्हा बिबट्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस परिसर बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणत असून, शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या उपद्रवामुळे मेंढपाळांनी मानूर परिसरातून स्थलांतरित होण्यास सुरवात केली आहे. शेळीपालन करणारे आदिवासी बांधवाना पशुधनाच्या सुरक्षतेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मानूर गावात बिबट्या येणे ही बाब आता नित्याची झाली आहे. आज शिवारातील शेतीची कामे करताना बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. गावातील मजूर कामास येण्यास धजावत नसून पशुपालनाचा व्यवसाय करणारे आदिवासी बांधवांचेही शेळ्या चरावयास शिवारात जाणे बंद झाले आहे. बिबट्या परिसरात आल्यापासून गावकऱ्यांना व पशुपालकांना व मेंढपाळांना दहशतीत वावरावे लागते.