नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढत टोळीच्या गैरमार्गाने सुरू असलेल्या वसुलीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणातून मागील वर्षी १६ नोव्हेंबरला योगेश पन्नालाल चयल (२३, रा. देवळाली गाव) यास एका टोळीने कोयत्याने सपासप वार करून ठार मारले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांसह त्यांच्या अन्य अकरा साथीदार अशा एकूण २२ गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. बुधवारी (दि. १२) या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या वेळी चयल याचा मित्र सुरज बद्रीनारायण कहाणे यास संशयित हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्याची ॲक्टिव्हा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. उपनगर पोलिसांसह गुन्हेशाखा युनिट २ व मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकांनी समांतर तपास करत गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सोनू पाईकराव (२२) याच्यासह एकूण ११ संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात संघटितप्रकारे गुन्हेगारांची टोळी सक्रिय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, उर्वरित ११ साथीदारांच्या दुसऱ्या टोळीच्याही मुसक्या बांधल्या. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअन्वये कारवाई करत सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे तपास सोपविला. गुन्ह्यातील २२ संशयितांच्या टोळीचा मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाण्डेय यांनी तयार करून अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. याबाबत त्यांनी चौकशी करत या प्रस्तावास मंजुरी देत मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.यांच्यावर चालणार ह्यमोक्काह्णनुसार खटलामुख्य सूत्रधार व टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सोनू पाईकराव याच्यासह रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या, जय ऊर्फ वाल्मीक घोरपडे, राहुल भारत तेलोरे, कलाम सलिम राईन, सत्तू भैरू राजपूत, हर्ष सुरेश म्हस्के, जॉन चलन पडेची, योगेश श्रावण बोडके, साहील सुरेश म्हस्के, अमन हिरालाल वर्मा, अक्षय राजेंद्र पारचे, बाबू मनियार ऊर्फ संदीप सुंदरलाल, शिबन शफी शेख, अनुज हरबिर बेहनवाल, गोलू जेसुला बाबू, आतिश वामन तायडे, बॉबी ऊर्फ हर्ष किशोर बाबू, अजय राजेंद्र लोहट यांच्यासह तीन विधिसंघर्षित बालकांवर आता मोक्कानुसार खटला चालणार आहे.
चयल खुनातील संशयितांच्या मोक्कावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:29 PM
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढत टोळीच्या गैरमार्गाने सुरू असलेल्या वसुलीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणातून मागील वर्षी १६ नोव्हेंबरला योगेश पन्नालाल चयल (२३, रा. देवळाली गाव) यास एका टोळीने कोयत्याने सपासप वार करून ठार मारले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांसह त्यांच्या अन्य अकरा साथीदार अशा एकूण २२ गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. बुधवारी (दि. १२) या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.
ठळक मुद्दे२२ सराईतांची टोळी : अपर पोलीस महासंचालकांनी दिला ग्रीन सिग्नल