नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्णात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. परंतु जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्णात ढिंडोरा पिटला जात असताना टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने ग्रामीण भागात टॅँकर सुरू करण्यास चालढकल चालविली होती. अखेर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा दबावामुळे प्रशासनाने फेब्रुवारीत टॅँकर सुरू केले. मार्च महिन्यापासून दर आठवड्याला टॅँकरची संख्या वाढू लागली असून, एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या २५६ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्णातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला या आठ तालुक्यातील २०७ गावे व ६९४ वाड्या अशा ९०१ गावांतील सुमारे पाच लाख लोकवस्तीला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. टॅँकरबरोबरच १०१ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहिरीतून गावासाठी पिण्याच्या पाण्याची तसेच काही गावांसाठी टॅँकर भरण्याच्या कामी या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. धरणात फक्त १८ टक्के पाणी उष्णतेचे वाढते प्रमाण व पाण्याची सातत्याने होणारी मागणी पाहता, जिल्ह्णातील धरणांची पातळी कमालीची खालावली आहे. लहान-मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये जेमतेम १८ टक्केपाणी शिल्लक राहिले असून, पुणेगाव, नांदुरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० टक्के साठा असून, समूहात २५ पाणी साठा आहे. दारणा २१ टक्के, तर ओझरखेडमध्ये १६ टक्के पाणी शिल्लक आहे.
टॅँकरने ओलांडला अडीचशेचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:19 AM
नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.
ठळक मुद्दे९०१ गावे, वाड्यांना टंचाई : १०१ विहिरी अधिग्रहित