चांदोरी : नांदूरमाधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोबर २०२० साठी पक्षी प्रगणना शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ ते ११ या वेळेत वनाधिकारी, कर्मचारी, गाईड, स्वयंसेवक यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, गोदावरी पात्र, काथरगाव, कुरडगाव, कोठुरे या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात ५६ प्रजातींचे ७१४९ पाणपक्षी व ४५ प्रजातींचे १८११ झाडांवरील, गवताळ भागातील पक्ष्यांच्या अशा एकूण ८९६० नोंदी घेण्यात आल्या.यात प्रामुख्याने गढवाल, पिनटेल, हळदीकुंकू, थापट्या, टर्न, चित्रबलाक, राखी बगळा, जांभळा बगळा, कमलपक्षी, वारकरी, दलदल ससाणा, पोचार्ड आदी पक्षी दिसून आले. थंडीचा मोसम सुरू होत असल्याने यात स्तलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अद्याप अभयारण्य बंद असल्याने पर्यटनबंदी उठवल्यानंतर पक्षिनिरीक्षणाचा आनंद पर्यटकांना घेता येईल. पक्षी प्रगणना सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब काळे, वनसंरक्षक तांबे, पक्षिमित्र दत्ता उगावकर, डॉ. डेरले, प्रा. आनंद बोरा, अनिल माळी, बाळा सरोदे, किरण बेलेकर, राहुल वढघुले, नुरी मर्चंट, डॉ. सीमा पाटील, दर्शन घुगे, कर्मचारी जाधव, गांगुर्डे, गायकवाड, मोगल, साळवे, फापाळे, पोटे, डोंगरे, दराडे, लोखंडे यांनी पूर्ण केली.
दुसऱ्या मासिक प्रगणनेत आढळले ८९६० पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 7:04 PM
चांदोरी : नांदूरमाधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोबर २०२० साठी पक्षी प्रगणना शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ ते ११ या वेळेत वनाधिकारी, कर्मचारी, गाईड, स्वयंसेवक यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, गोदावरी पात्र, काथरगाव, कुरडगाव, कोठुरे या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात ५६ प्रजातींचे ७१४९ पाणपक्षी व ४५ प्रजातींचे १८११ झाडांवरील, गवताळ भागातील पक्ष्यांच्या अशा एकूण ८९६० नोंदी घेण्यात आल्या.
ठळक मुद्देचांदोरी : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोबर पक्षी प्रगणना पूर्ण