नाशिक : नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थी व पालकांचे लक्ष दुसºया यादीतील कटआॅफकडे लागले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक ९१ टक्के तर वाणिज्य शाखेचा कट आॅफ ८८ टक्के जाहीर झाला होता. दुसºया यादीचा कटआॅफ तीन ते चार टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. दुसºया यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत प्रवेश घेणे अनिवार्य असेल. पहिल्या यादीत निवड झालेल्या १५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. त्यामुळे पहिल्या यादीनंतरचे सात हजार आणि उर्वरित दहा हजार अशा एकूण १७ हजारांहून अधिक विद्यार्थी दुसºया गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या यादीप्रमाणेच विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफ हा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाविद्यालयांत मात्र कटआॅफ खाली येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे लक्ष दुसºया यादीकडे लागले आहे. पहिल्या यादीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील केवळ ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिली गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या ९ हजार २२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि. १६) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे प्रवेश पुढील तीन नियमित फेºयांसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) करण्यात आले आहे. त्यांचा प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावीचा सीट क्रमांक ब्लॉक होतील. इन्फो१५ हजार जागा उपलब्धनाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या २३ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत कला शाखेतील २ हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून दुसºया ते दहाव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळल्यानंतर ज्या विद्यर्थ्यांनी प्रथम पंसतीच्या महाविद्यालयासाठी थांबण्याची भूमिका घेतली आहे, त्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे.
अकरावी प्रवेशासाठी सोमवारी दुसरी गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 5:30 PM
नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थी व पालकांचे लक्ष दुसºया यादीतील कटआॅफकडे लागले आहे.
ठळक मुद्देप्रथम फेरीसाठी सोमवारी अकरावी प्रवेशासाठी दुसरी यादीरिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षाप्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्या, प्रवेश अनिवार्य