येवला : तालुक्यातील साताळी ग्रामपंचायतीत विविध विकास कामात अपहार झाल्याची तक्र ार ग्रामपंचायत सदस्य गणेश कोकाटे यांचेसह काही ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांचेकडे केली आहे. दरम्यान, साताळी ग्रामपंचायतीवर हिशोब देण्याच्या कारणावरून प्रजासत्ताकदिनासह दि. २८ जानेवारीला झालेली ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली.साताळी येथील ग्रामसभा दोन वेळा कोरम पूर्ण असूनही ताळेबंदाच्या कारणावरून तहकूब करण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेला १५० पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने प्रभारी सचिव म्हणून साताळी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेकडे प्रभारी सचिव म्हणून पदभार सोपविण्यात आला होता. मात्र ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभारी सचिवांना समर्पक उत्तरे देता आली नाही.त्यामुळे सभा तहकूब करून पुन्हा २८ जानेवारी रोजी सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत देखील आर्थिक व्यवहाराबद्दल ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे माहिती नसल्याने ही सभा देखील तहकूब करण्यात आली . मागील ३ वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. निकृष्ट प्रतीच्या कामाच्या खर्चाचा ताळमेळ ग्रामसेवक ग्रामसभेत सादर करत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवकाने ७ दिवसात सदर माहिती ग्रामसभेत सादर करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माहिती न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याकडे दाद मागणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश कोकाटे यांच्यासह विलास कोकाटे, किरण काळे, सुभाष कोकाटे, वाल्मिक काळे यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.नियमानुसारच कामेग्रामपंचायतीने नियमानुसारच कामे केली आहे. विरोधकांच्या तक्ररीमध्ये राजकारण आहे. राजकीय हेतू ठेवून झालेल्या तक्र ारीत तथ्य नाही. चौकशीत ‘दुध का दुध,पाणी का पाणी’स्पष्ट होईल.- भाऊसाहेब कळसकर, सरपंच, साताळी
साताळीची ग्रामसभा दुसऱ्यांदा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:24 PM
गैरव्यवहाराचा आरोप : माहिती सादर करण्याची मागणी
ठळक मुद्देमाहिती न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याकडे दाद मागणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश कोकाटे यांच्यासह विलास कोकाटे, किरण काळे, सुभाष कोकाटे, वाल्मिक काळे यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.