ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीसाठी शहरातील विविध उपनगरीय भागांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ असून या संघांद्वारे ज्येेष्ठांना एकप्रकारे व्यासपीठच उपलब्ध झाले आहे; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हे व्यासपीठ जणू कोलमडून पडले की काय? अशी शंका येते. कारण एकत्र येण्यावरच आता निर्बंध आल्याने ज्येष्ठांच्या भेटीगाठी, गप्पाटप्पादेखील कमी झाल्या आहेत. ज्येेष्ठांकरिता परिसरातील विविध समाजमंदिरांमध्ये होणारे धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरातच एकप्रकारे ‘बंद’ होण्याची वेळ ओढावल्याचे दिसते.
--इन्फो--
निर्बंधांच्या काळात अधिकच गैरसोय
जे आजी-आजोबा आपल्या घरात एकमेकांच्या आधाराने राहतात किंवा केवळ आजी, आजोबा एकटेच वास्तव्यास आहे, अशा वृद्धांची तर फारच अडचण होऊन बसली आहे. त्यांना गोळ्या-औषधे मागविण्यापासून तर अन्य सगळ्याच गोष्टी उपलब्ध करताना अडचण भेडसावते. अशावेळी अनेकदा दारावर येणारा भाजीवाला, फळविक्रेता किंवा अन्य फेरीवाल्यांपासून गरजेची वस्तू खरेदी करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करावा लागतो. कोरोनाकाळात झालेले लॉकडाऊन, निर्बंधांमुळे तर अशा एकाकी राहणाऱ्या वृद्धांना तर मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते.
---इन्फो---
पोलीस ठाण्यांकडे वृद्धांची नोंदच नाही
वृद्धांची हेळसांड होऊ नये, तसेच त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून त्रास होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना याबाबत माहिती घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत त्याची योग्यरित्या शहानिशा करण्याचे आदेशित केले आहे. मात्र शहरातील विविध पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला असता बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकटे आजी, आजोबा किती वास्तव्यास आहे, याची कुठल्याही स्वरुपाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक संघांची आकडेवारी असल्याचे सांगण्यात आले.
--पॉइंटर्स--
शहरातील पोलीस ठाणे - १३
पोलीस अधिकारी- २२९
पोलीस कर्मचारी- ३०७१
महिला पोलीस- ४४९
250721\25nsk_1_25072021_13.jpg~250721\25nsk_2_25072021_13.jpg
ज्येष्ठ नागरिक~ओल्ड मॅन