नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़प्रदीप पावगी (५६) यांचा जनरल वैद्यनगरमध्ये सुक्त नावाचा बंगला असून, बंगल्याच्या देखभालीसाठी त्यांनी संशयित सुशांत चौधरी व ममता चौधरी या दाम्पत्यास कामासाठी ठेवले होते़ पावगी यांनी आपल्या बंगल्याची चावी विश्वासाने वॉचमनकडे सोपविली होती़ या दाम्पत्याने याचा फायदा घेत घरातील पर्समध्ये ठेवलेली ५६ हजार रुपयांची रोकड, ८५ हजार रुपये किमतीचा डायमंड नेकलेस, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली असा २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ मुंबई नाका पोलिसांनी संशयित सुशांत चौधरी व ममता चौधरी या दोघांना अटक केली आहे़
सुरक्षारक्षकाने चोरले अडीच लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:33 AM
नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ठळक मुद्देमुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल