नाशिक : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आतापर्यंत तीन क्रांत्या झाल्या असून, या तिन्ही क्रांत्यांमध्ये सुरक्षा हा समान घटक असल्याचे मत डॉ. यू. के. सिंग यांनी व्यक्त केले.जी. डी. सावंत महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यमाने चर्चासत्र झाले. बी. बी. चौरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. यू. के. सिंग यांच्या बीजभाषणाने सुरू झाले. दुसऱ्या सत्रात डॉ. रामजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. अर्चना पाटील यांनी नेटवर्कमधील सुरक्षेचा प्रश्न, तर प्रा. सी. एस. भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानातील भ्रमणध्वनी क्रांतीचे मूल्यमापन’ आणि डॉ. सुप्रिया कुलथे यांनी ‘फेसबुक : संवादाचे नवे साधन’ या विषयावरील पेपर वाचले. तिसऱ्या सत्रात प्रा. एस. आर. ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. उमेश सुर्वे यांनी ‘वायफाय आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर पेपर वाचला. (प्रतिनिधी)